ग्रामपंचायत भ्रष्टाचार कसा ओळखायचा?
1️⃣ काम झाले नाही – पण बिल पास
✅ उदा: रस्ता, गटर, लाईट्सची कामं प्रत्यक्षात नाहीत, पण खर्च दाखवलेला आहे.
📌 उपाय : साइटवर जाऊन पाहणी करा. नोंदी मागा.
2️⃣ बिल न दाखवता पैसे दिले जातात
✅ सरकारी कामाचे बिल, वर्क ऑर्डर, M-Book दाखवले जात नाहीत.
📌 उपाय : RTI (माहितीचा अधिकार) वापरून ती माहिती मागू शकता.
3️⃣ ग्रामसभा नियमित होत नाही
✅ ग्रामसभा ही भ्रष्टाचार रोखण्याचं मुख्य माध्यम आहे. ती जर होत नसेल किंवा लोकांना बोलावलं जात नसेल – तर संशय बाळगा.
4️⃣ काम केलेल्या फोटोंमध्ये फसवणूक
✅ एखादं काम केलं असं दाखवण्यासाठी जुन्या फोटोंचा वापर केला जातो.
5️⃣ फक्त एकाच ठेकेदाराला वारंवार कामं दिली जातात
✅ स्पर्धा न करता नेहमी एकाच माणसाला काम मिळणं हे चुकीचं आहे. हे “नाते” असण्याची शक्यता.
6️⃣ फसव्या स्वाक्षऱ्या (बोगस ठराव)
✅ काही वेळा सदस्यांच्या नकळत ठराव मंजूर करून स्वाक्षऱ्या लावल्या जातात.
📌 उपाय : RTI ने ठरावाची कॉपी मागवा. त्यातील नावे व सह्या तपासा.
7️⃣ खर्चाचा हिशोब ग्रामपंचायतीमध्ये लावला जात नाही
✅ वर्षाच्या शेवटी किंवा ठराविक काळाने हिशोब ग्रामसभेत लावला पाहिजे. तो जर लपवला जात असेल तर संशय होतो.

8️⃣ गावातील लोकांचा सहभाग टाळला जातो
✅ जेव्हा गावातील लोक प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांना गप्प बसवले जाते, त्यांच्यावर दबाव आणला जातो, किंवा धमक्या दिल्या जातात – हे भ्रष्टाचाराचं मोठं लक्षण.
9️⃣ मंजुरी घेण्यापूर्वीच काम सुरू होणे
✅ सरकारी नियमानुसार कोणतेही काम फक्त ठराव, अंदाजपत्रक, वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर सुरू होऊ शकते.
✅ जर काम आधीच सुरू असेल, तर ते “पछाडलेलं बिल” (back-dated) असण्याची शक्यता असते.
🔟 समान वस्तूंना वेगवेगळे दर
उदाहरण
✅ उदा. LED लाईट 1 गावात ₹900 दाखवलेले, आणि दुसऱ्या गावात ₹1500 — यावरून किकबॅकचा अंदाज येतो.
📌 उपाय : इतर गावांच्या खर्चाशी तुलना करा.
1️⃣1️⃣ कामाचा दर्जा अत्यंत खराब असणे
✅ रस्त्यावर 2-3 महिन्यातच खड्डे पडतात, ड्रेनेज तुटते – हे सगळं “low cost, high bill” तंत्र आहे.
1️⃣2️⃣ काम करणारे मजूर फक्त नावापुरते
✅ मजुरांची यादी दाखवली जाते पण प्रत्यक्षात ते काम करतच नसतात (Ghost workers).
📌 उपाय : MGNREGA, शौचालय, मनरेगा लिस्ट मधून नावे तपासा.
1️⃣3️⃣ निवडणुकीपूर्वी अचानक विकास कामांची घोषणा
✅ यामागे अनेकदा पैसा लाटण्याचा हेतू असतो – तातडीने मंजुरी, कमी वेळेत काम, बिलात घोटाळा.
🤳 इंस्टाग्राम रील पहा 👉 https://www.instagram.com/reel/DK9mPv-Nqab/?igsh=MW5odDczNG52N3JlZA==
🛑 भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्थानिक उपाय
1️⃣ RTI अर्ज 👉 वर्क ऑर्डर, बिल, मंजुरीचे ठराव, खर्च अहवाल मागवा.
2️⃣ ग्रामसभा 👉 शक्यतो व्हिडिओ रेकॉर्ड ठेवा, प्रश्न विचारा.
3️⃣ जिल्हा परिषद वेबसाईट 👉 निधी आणि कामांची माहिती तिथे असते.
4️⃣ सोशल मीडिया 👉 भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पोस्ट व्हायरल करा.
5️⃣ लोकशाही दिन / जनसुनावणी 👉 प्रत्येक महिन्याला तहसील कार्यालयात असतो.
🛑 भ्रष्टाचाराच्या तक्रारी कुठे करता येतात?
| पातळी | तक्रार करण्याचे ठिकाण |
|---|---|
| ग्रामपंचायत | ग्रामसेवक / सरपंच / ग्रामसभा |
| तालुका | BDO (Block Development Officer) |
| जिल्हा | Zilla Parishad / CEO |
| ऑनलाइन | MAHA GRAM Portal किंवा RTI फॉर्म |

